तुळजाभवानी देवीच्या 4 पुजाऱ्यांना 3 महिन्यासाठी मंदिर प्रवेश बंदीची कारवाई
सोने पळविणे, भाविकांना शिवीगाळ व न्यायाधीश यांच्याशी वाद घालणे भोवले
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील 4 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने 3 महिन्यासाठी मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली असून त्यांना 6 महिने प्रवेश बंदी का करू नये अश्या लेखी नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. भाविकांनी देवीला अर्पण करण्यासाठी दिलेले सोने पळविणे, भाविकांना विनाकारण शिवीगाळ करणे व न्यायाधीश यांच्याशी वाद घालणे अश्या वेगवेगळ्या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे. शिस्तभंग व नियमभंग करणे या पूजाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. मंदिर संस्थानकडे भाविकांनी केलेल्या तक्रारी व सीसीटीव्ही फुटेज आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.पुजारी दत्ता सुभाष बर्वे, नवनाथ आबासाहेब पिसे, संभाजी नेताजी क्षीरसागर व अरविंद अपसिंगेकर अशी या 4 पुजाऱ्यांची नावे आहेत.
एका तुळजाभवानी देवीच्या भक्ताने देवीस अर्पण करण्यासाठी 2 तोळे सोन्याचे मंगळसूत्र पुजारी बर्वे व पिसे यांच्याकडे 8 मे रोजी दिले होते त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन या दोघांनी संगणमत करून सोन्याचे मंगळसूत्र देवीस अर्पण केल्याचे भासविले व ते मंगळसूत्र पूजेच्या ताटात लपवून ठेवले, त्यांच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या असून याबाबत सुरक्षा रक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील भक्त बालाजी ढोमणे पाटील हे दर्शन घेत असताना पुजारी क्षीरसागर यांनी मुखदर्शन व धर्मदर्शन रांगेत जाऊन शिवीगाळ केली व 751 रुपये इतक्या पैशाची मागणी केली. देवीचे दर्शन भाविकांना घेण्यासाठी शिव्या खाव्या लागतील हे मोठे दुर्दैव असल्याची तक्रार भाविकाने मंदिर संस्थानच्या व्हाट्स अँपवर केली त्यांनतर त्याची दखल घेऊन 3 महिने मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली.
सातारा येथील जिल्हा न्यायाधीश विवेक कठारे हे सहकुटुंब देवीदर्शनासाठी आले असता पुजारी अपसिंगेकर यांनी विनाकारण कठारे यांच्याशी वाद घालत चुकीची वागणूक दिली, याबाबत कठारे यांनी मंदिर संस्थानच्या व्हाट्स अँपवर तसेच तक्रार रजिस्टरमध्ये लेखी तक्रार दिली, या घटनेच्या सिसिटीव्ही आधारे अपसिंगेकर यांना 3 महिने प्रवेश बंदी केली आहे. चारही पुजाऱ्यांवर देऊळ कवायात कलम 24 व 25 नुसार प्रवेशबंदीची कारवाई मंदिर संस्थानने केली आहे.
तुझा नंबर दे रे झाटु तुझ्यावर केसच करतो आता खोट्या बातम्या देऊन खोटे अॅलीगेशन दिले म्हणून