तुळजाभवानी देवीच्या प्राचीन नाण्यावर डल्ला प्रकरण – आरोपी दिलीप नाईकवाडी यांच्या जामीनावर 11 नोव्हेंबरला सुनावणी
तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. नाईकवाडी यांना 20 सप्टेंबर रोजी नाईकवाडी यांना अटक केल्यानंतर त्यांना 29 सप्टेंबर पर्यंत 3 वेळेस 9 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
शिवकालीन व इतर राजेराजवाडे यांनी देवीला अर्पण केलेले 71 प्राचीन नाणे पैकी एकही नाणे नाईकवाडी यांच्याकडून जप्त न झाले नाही व तपासात नाईकवाडी यांच्यासोबत असलेल्या महत्वाच्या साथीदारांची नावे समोर आली नाहीत असे सूत्रांकडून कळते .नाईकवाडी यांनी 35 तोळे सोने , 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता. नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्या टप्याने पुरातन नाणी गायब केली आहेत असा आरोप आहे.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर झालेल्या चौकशीत हा घोटाळा समोर आला.तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग केला त्यांच्यावर 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .
तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते.