तुळजाभवानीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरण – विधी विभागाचा सल्ला घेऊन आठवड्यात निर्णय
धाराशिव –
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने चांदी दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली असुन लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे त्यातील सोने वितळविले जाणार आहे. 207 किलो सोनेपैकी 111 किलो शुद्ध सोने मिळू शकते असा अंदाज आहे यापुर्वी देवीकडे 47 किलो शुद्ध 24 कॅरेट सोने आहे.
देवीच्या डब्यातील पुरातन दागिने मोजदाद प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बैठक घेतली. अहवालावर चर्चा करुन समितीने काढलेल्या निष्कर्षानंतर कायदेशीर काय कारवाई करायची यासाठी विधी विभागाचे मार्गदर्शन मागविले आहे.
येत्या आठवड्यात अंतीम अहवाल येण्याची शक्यता आहे.काही सोन्याची दागिने व चांदीच्या वस्तू गायब आहेत तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले आहे.
Byte डॉ सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी