*तिसऱ्या लाटेचे संकेत ? – लहान मुले कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले*
उस्मानाबाद : समय सारथी
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचे स्पष्ट संकेत पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण 6 ते 7 टक्क्यांवर आले असतानाच लहान मुले कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.गेल्या 3 दिवसात जिल्ह्यात सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 18 टक्के बालकांचा समावेश आहे. 0 ते 18 या वयोगटातील बालके कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पण या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण हे शून्य टक्के आहे ही मोठी दिलासादायक बाब आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णची संख्या घटली असून आजच्या स्तिथीत जिल्ह्यात केवळ 946 सक्रीय रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेचे संकेत मिळाले असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजन प्लांट उभारणी बाबतीतील प्रक्रियेत संथ गतीने काम करीत आहे. तिसऱ्या लाटेचे अनेक नियोजन हे सध्या कागदावरच आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज शुक्रवारी नवीन 123 रुग्ण सापडले तर 232 जण उपचारानंतर बरे झाले, आज केवळ 1 रुग्णांचा मृत्यू झाला तर यापूर्वीचे 6 मृत्यू हे ऑनलाइन पोर्टलवर नोंद झाल्याने हा आकडा 7 झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 9 जुन रोजी 119 कोरोना रुग्ण सापडले त्यापैकी 25 हे 0 ते 18 या वयोगटातील होते म्हणजे 21 टक्के रुग्ण बालगटातील सापडले तर 10 जुन रोजी 109 रुग्ण सापडले त्यापैकी 19 हे बालक होते हे प्रमाण 17 टक्के होते तर आज 123 रुग्ण सापडले असुन त्यापैकी 21 म्हणजे 17 टक्के रुग्ण हे बालगटातील आहेत. गेल्या 3 दिवसात सरासरी 18 टक्के रुग्ण हे 0 ते 18 वयोगटातील सापडले आहेत. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची शक्यता सरकार व आरोग्य विभागाने वर्तवली आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण असताना संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वीच लहान बालके कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाल्याने आगामी संकटाची गंभीरता लक्षात येते. विशेष म्हणजे 0 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी सध्या कोणत्याही प्रकारची लस भारतात उपलब्ध नसुन या गटातील बालकांना रेमडीसिव्हीरसह इतर स्टेरॉईड औषधे वापरावर आयसीएमआरने तूर्तास मर्यादा म्हणजे बंदी घातली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही आगामी 2 महिन्यात सुरू होईल असा अंदाज वर्तविला जात असतानाच त्यापूर्वीच बालके कोरोनाबाधीत सापडण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आरोग्य प्रशासनाने वेळीच ऑक्सिजन, बेड व इतर आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. सध्या ऑक्सिजनचा वापर कमी असल्याने अनेक बेड व सिलेंडर शिल्लक आहेत मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा 150 पट म्हणजे दीड पट अधिक ऑक्सिजन लागेल असा अंदाज आहे तर तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दुप्पट रुग्ण सापडतील असा अंदाज आहे व त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या लेखी सूचना आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा ,परंडा व उमरगा उपजिल्हा रुग्णालयासह तेर, भूम, वाशी,मुरूम व लोहारा अश्या 9 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचे नियोजन आहे मात्र सध्या तरी याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याने हे नियोजन कागदावरच आहे. टेंडर अंतीम झाल्यावर हे काम करण्यासाठी अंदाजे 6 आठवडे म्हणजे दीड महिना लागणार आहे. सध्या सीएसआरमधुन उमरगा व तुळजापूर येथे काम सुरू आहे मात्र मागील अनुभव पाहता ऑक्सिजन प्लांटचे काम ठरून दिलेल्या वेळेत न होता ते रखडले होते त्यामुळे किमान या तिसऱ्या लाटेपूर्वी तरी हा प्रश्न मार्गी लागला तरच ऑक्सिजन तुटवडा भासणार नाही व नागरिकांची धावपळ होणार नाही. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत इंजेक्शन, औषधी तुटवडा असल्याचे अनुभवायला आल्याने प्रशासन व रुग्णांची मोठी गैरसोय झाली तर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता शिवाय अप्रामाणिक औषधे व गोळ्या रुग्णांच्या माथी मारण्यात आल्या.
कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे तर लहान बालकांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचाराची स्वतंत्र सुविधा केली आहे त्यामुळे पालकांनी न घाबरता योग्य वेळी लक्षणे दिसल्यावर डॉक्टर यांना दाखवुन उपचार घेतले पाहिजेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 88 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 35 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.आज 1 हजार 898 जणांची तपासणी करण्यात आल्या त्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले हा पॉझिटिव्हीटी दर हा 6.48 टक्के आहे. आज 07 रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला असून कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या 1 हजार 309 झाली आहे, हा मृत्यू दर 2.31 टक्के आहे . जिल्ह्यात 54 हजार 360 रुग्ण बरे झाले असून 96.01 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात शुक्रवारी 38 रुग्ण , तुळजापूर 17, उमरगा 09, लोहारा 17, कळंब 17, वाशी 10, भूम 6 व परंडा तालुक्यात 9 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा आलेख
1 मार्च – 09 रुग्ण – 00 मृत्यू
2 मार्च – 40 रुग्ण – 01 मृत्यू
3 मार्च – 16 रुग्ण – 00 मृत्यू
4 मार्च – 45 रुग्ण – 02 मृत्यू
5 मार्च – 26 रुग्ण – 00 मृत्यू
6 मार्च – 30 रुग्ण – 00 मृत्यू
7 मार्च – 49 रुग्ण – 00 मृत्यू
8 मार्च – 16 रुग्ण – 01 मृत्यू
9 मार्च – 38 रुग्ण – 01 मृत्यू
10 मार्च – 24 रुग्ण – 00 मृत्यू
11 मार्च – 58 रुग्ण – 00 मृत्यू
12 मार्च – 27 रुग्ण – 01 मृत्यू
13 मार्च – 54 रुग्ण – 00 मृत्यू
14 मार्च – 69 रुग्ण – 00 मृत्यू
15 मार्च – 52 रुग्ण – 00 मृत्यू
16 मार्च – 123 रुग्ण – 01 मृत्यू
17 मार्च – 94 रुग्ण – 00 मृत्यू
18 मार्च – 164 रुग्ण – 00 मृत्यू
19 मार्च – 119 रुग्ण – 00 मृत्यू
20 मार्च – 125 रुग्ण – 00 मृत्यू
21 मार्च – 118 रुग्ण – 01 मृत्यू
22 मार्च – 173 रुग्ण – 00 मृत्यू
23 मार्च – 130 रुग्ण – 00 मृत्यू
24 मार्च – 176 रुग्ण – 00 मृत्यू
25 मार्च – 174 रुग्ण – 00 मृत्यू
26 मार्च – 155 रुग्ण – 02 मृत्यू
27 मार्च – 224 रुग्ण – 00 मृत्यू
28 मार्च – 184 रुग्ण – 00 मृत्यू
29 मार्च – 239 रुग्ण – 00 मृत्यू
30 मार्च – 242 रुग्ण – 00 मृत्यू
31 मार्च – 253 रुग्ण – 02 मृत्यू
=====================
1 एप्रिल – 283 रुग्ण – 04 मृत्यू
2 एप्रिल – 292 रुग्ण – 00 मृत्यू
3 एप्रिल – 343 रुग्ण – 02 मृत्यू
4 एप्रिल – 252 रुग्ण – 00 मृत्यू
5 एप्रिल – 423 रुग्ण – 02 मृत्यू
6 एप्रिल – 415 रुग्ण – 08 मृत्यू
7 एप्रिल – 468 रुग्ण – 05 मृत्यू
8 एप्रिल – 489 रुग्ण – 02 मृत्यू
9 एप्रिल – 564 रुग्ण – 00 मृत्यू
10 एप्रिल – 558 रुग्ण – 07 मृत्यू
11 एप्रिल – 573 रुग्ण – 03 मृत्यू
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
18 एप्रिल – 477 रुग्ण – 16 मृत्यू
19 एप्रिल – 662 रुग्ण – 10 मृत्यू
20 एप्रिल – 645 रुग्ण – 21 मृत्यू
21 एप्रिल – 667 रुग्ण – 23 मृत्यू
22 एप्रिल – 719 रुग्ण – 21 मृत्यू
23 एप्रिल – 719 रुग्ण – 16 मृत्यू
24 एप्रिल – 810 रुग्ण – 20 मृत्यू
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
==================
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 629 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू
20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू
21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू
22 मे – 577 रुग्ण – 11 मृत्यू
23 मे – 392 रुग्ण – 12 मृत्यू
24 मे – 406 रुग्ण – 06 मृत्यू
25 मे – 409 रुग्ण – 08 मृत्यू
26 मे – 306 रुग्ण – 05 मृत्यू
27 मे – 356 रुग्ण – 08 मृत्यू
28 मे – 288 रुग्ण – 08 मृत्यू
29 मे – 303 रुग्ण – 08 मृत्यू
30 मे – 219 रुग्ण – 08 मृत्यू
31 मे – 291 रुग्ण – 08 मृत्यू
==================
1 जुन – 89 रुग्ण – 08 मृत्यू
2 जुन – 340 रुग्ण – 07 मृत्यू
3 जुन – 179 रुग्ण – 06 मृत्यू
4 जून – 160 रुग्ण – 06 मृत्यू
5 जून – 177 रुग्ण – 04 मृत्यू
6 जून – 106 रुग्ण – 04 मृत्यू
7 जून – 142 रुग्ण – 06 मृत्यू
8 जून – 124 रुग्ण – 05 मृत्यू
9 जून – 119 रुग्ण – 08 मृत्यू
10 जून – 109 रुग्ण – 03 मृत्यू
11 जून – 123 रुग्ण – 07 मृत्यू