तणावाचे वातावरण – परंडा येथे लाठीचार, महायुती व महाविकास आघाडी गट भिडले
धाराशिव – समय सारथी
परंडा येथे तणावाचे वातावरण असुन महायुती व महाविकास आघाडी गट एकमेकांसोबत भिडल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार केला त्यानंतर स्तिथी निवळली.
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल मोटे यांच्या कार्यकर्ते मध्ये बाचाबाची नंतर लाठीचार करण्यात आला.
मंत्री सावंत यांच्या गटाने महाविकास आघाडीचे काही संचालक फोडल्याच्या चर्चेने दोन्ही गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र सावंत गटाने हे आरोप फेटाळले असुन आम्ही कोणलाही पळविले नाही किंवा आम्ही अर्जही दाखल केला नाही. आज कोणीही अर्ज दाखल न केल्याने निवड प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
परंडा बाजार समितीत 18 जागापैकी 13 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या असून, 5 जागा भाजप शिवसेना शिंदे गट यांच्या ताब्यात आहेत.
आमचे सदस्य उजनी भागात असताना तिथे काही जण आले व त्यांनी बळजबरीने बंदूकांचा धाक दाखवीत त्यांना पळवून नेले असल्याचा आरोप माजी आमदार राहुल मोटे व ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर केला तर आम्ही कोणालाही पळविले किंवा बळजबरी केली नाही. आमच्याकडे 5 सदस्य असल्याने आम्ही अर्ज भरला नाही, आरोप खोटे व चुकीचे असल्याचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी सांगितले.