तणावपूर्ण शांततेत निवडी बिनविरोध पार – परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड
परंडा – समय सारथी
तणावपूर्ण शांततेत बहुचर्चित परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापती पदाची निवडनुक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. सभापतीपदी जयकुमार जैन यांची निवड तर उपसभापतीपदी संजय पवार यांची निवड झाली. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राहुल मोटे यांनी महाविकास आघाडीचे सर्वl संचालक एकत्र आणले आणि त्यानंतर प्रक्रिया पार पडली यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. भाजप शिवसेना महायुतीच्या सावंत गटाने या निवडणुकीत अर्ज भरला नाही, राडा व गोंधळाची स्तिथी पाहून त्यांनी यात सहभाग घेतला नाही. सहायक निबंधक कुमार बारकूल यांनी काम पाहिले.
सभापती व उपसभापती निवडीपूर्वी 24 मे रोजी महाविकास आघाडीच्या संचालकांचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करुन जबर मारहाण केल्याप्रकरणी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत गटाचे कार्यकर्ते सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह 5 आरोपीना पोलिस कोठडी दिली आहे. संचालकांचे अपहरण केल्यानंतर खुद्द विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यात लक्ष घातले त्यानंतर संचालकांची सुटका झाली.
परंडा बाजार समितीत 18 पैकी 13 जागा महाविकास आघाडी तर 5 जागा महायुती संचालक निवडून आले आहेत.