डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्तुंग यश
धाराशिव – समय सारथी
डॉ बापूजी साळुंखे विधि महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता ज्यामध्ये एलएलबी तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या शिवाजी पवार या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवरील युथ पार्लमेंट मध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामध्ये त्याला केंद्रीय राज्य वित मंत्री डॉ. भागवत कराड व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कडून प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 18 व 19 एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमासाठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी शिवानी ढवने हिची सचिव या पदासाठी निवड झाली आहे. त्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे राष्ट्रीय युवा संसदेसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये शिवानी ढवणे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय युवा संसद सचिव या पदासाठी निवडणूक लढवली व चांगल्या मतांनी निवडून आली.
डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय येथे या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्हीं जी शिंदे हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय आंबेकर यांनी केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थ्याचे योगदान या बाबतीत राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालय समन्वयक प्रा. इकबाल शाह यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ नितीन कुंभार यांनी केले. ह्या कार्यक्रमासाठी डॉ स्मिता कोल्हे, प्रा पुनम तापडिया, प्रा सोनाली पाटील व प्रा कैलाश शिकारे, संभाजी बागल हजर होते. ह्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.