डान्स बारवर छापा – 9 मुलींची सुटका तर 35 जणांना अटक, 58 लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिवचे सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या पथकाची मोठी कारवाई
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी उमरगा चौरस्ता येथील सौदागर ऑर्किस्ट्रा या डान्स बारवर छापा टाकून 9 महिलांची सुटका करीत 35 जणांना अटक केली आहे. या रेडमध्ये 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन उमरगा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, एम रमेश यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई केली जात आहे. एम रमेश हे उमरगा येथे गेले अस्ता गोपनीय माहितीनुसार जकेकूर चौरस्ता येथील सौदागर बार येथे अवैधरित्या महिला नृत्यगनावर पैसे उधळून अश्लील नृत्य सुरु असल्याची माहिती मिळाली व त्यानंतर त्यांनी रेड केली. या हॉटेलमध्ये सौदागर हॉटेल टेन लव्हर्स या नावाने कागदी नोटा बनवून उधळल्या जात होत्या. अटक केलेल्या आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन यात कळंब येथील पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड,उपनिरीक्षक पुजरवाड, सपोनि महेश क्षीरसागर,पोलिस कॉंस्टेबल फतेपुरे ,तारळकर ,गायकवाड, शिंदे , पोलिस नाईक शेख, भांगे,पठाण,खांडेकर,गरड ,राऊत,चव्हाण तसेच उमरगा पोलीस ठाण्यातील कर्मचारी मुंडे,सुनीता राठोड यांनी या कारवाईत भाग घेतला.