धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जाहिर केली असुन 55 गट अर्थात सदस्य संख्या असणार आहे, या रचनेवर 21 जुलै पर्यंत हरकती व सुचना सादर करता येणार आहेत, त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन 11 ऑगस्टला निर्णय घेऊन अंतीम प्रभाग रचना 18 ऑगस्ट पर्यंत राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील. 2022 साली धाराशिव तालुक्यात दोन, कळंब, तुळजापुर, लोहारा व परंडा येथे प्रत्येकी एक असे 6 गट वाढून 61 झाल्या होत्या मात्र त्या नवीन वाढीव जागा रद्द करुन 55 असा पूर्वीचा आकडा कायम राहिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 12 जागा असुन तुळजापूर व उमरगा तालुक्यात प्रत्येकी 9, कळंब तालुका 8, भुम व परंडा प्रत्येकी 5 जागा, लोहारा तालुका 4 व वाशी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 3 जागा असतील.
धाराशिव तालुक्यात ढोकी, पळसप, कोंड, तेर, येडशी, आंबेजवळगा, उपळा मा, सांजा, पाडोळी, केशेगाव, बेंबळी व वडगाव सिद्धेश्वर हे 12 गट असतील. भुम तालुक्यात ईट, सुकटा, पाथरूड, वालवड, आष्टा हे गट असतील. वाशी तालुक्यात पारगाव, पारा व तेरखेडा या 3 जागा असतील. कळंब तालुक्यात इटकूर, मंगरूळ, डिकसळ, शिराढोण, नायगाव, खामसवाडी, मोहा व येरमाळा अश्या 8 जागा असतील. परंडा तालुक्यात चिंचपुर, आनाळा, जवळा नि, डोंजा व आसू हे 5 गट असतील. तुळजापूर तालुक्यात सिंदफळ, काक्रबा,जळकोट,अणदूर, मंगरूळ, काटी, काटगाव, शहापुर व नांदगाव हे 9 गट असतील. लोहारा तालुक्यातील कानेगाव, माकणी, सास्तुर व जेवळी हे 4 गट तर उमरगा तालुक्यात कवठा, बलसुर, कुन्हाळी, तुरोरी, गुंजोटी, दाळिंब, येणेगूर, आलूर व कदेर असे 9 गट असतील.