जिल्हाधिकारी यांचे फेक अकाउंट – पैशाची मागणी करुन अनेकांना घातला गंडा, सावधानता बाळगा
धाराशिव – समय सारथी
फेसबुक या सोशल मीडियावर फेक अकाउंट सुरु करुन पैशाची मागणी करण्याचे रॅकेट सक्रीय असुन त्याचा फटका धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना देखील बसला आहे. जिल्हाधिकारी यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करीत पैसे मागितले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेक अकाउंट व त्या माध्यमातून पैशाची मागणी करीत फसवणूक केली जात असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पोस्ट करीत या सर्व प्रकाराचा उलघडा केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या नावाने 2-3 खोटी खाती तयार करुन पैशाची मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी यांच्या एका मित्राने त्यावर विश्वास ठेवुन काही रक्कम या टोळीच्या नावाने ट्रान्सफर केली आहे, हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी अश्या फेक अकाउंटवर विश्वास ठेवू नये तसेच पैसे ट्रान्सफर करू नये असे आवाहन केले आहे.