जिद्द, परिश्रम व सातत्य हीच यशाची त्रिसूत्री – माजी न्यायमुर्ती पी बी गायकवाड
डॉ बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न
धाराशिव – समय सारथी
डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठीच्या परीक्षेत महाविद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. महाविद्यालयात सर्व यशस्वी विद्यार्थी ॲड राहुल मुंडे, ॲड तृप्ती वैद्य, ॲड अभय गवळी, ॲड ओमप्रकाश लोमटे, ॲड अजित गवाड, ॲड रत्नदीप सोनावणे, ॲड राहूल शिंगणापूरे, ॲड बालाजी ढेकणे, ॲड नारायण भांगे, ॲड सचिन पवार, ॲड विशाल कवडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नानासाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमुर्ती पी बी गायकवाड यांच्यासोबत विश्वास(आप्पा) शिंदे, डॉ मोहन मुंडे,प्रा डॉ जयसिंगराव देशमुख व प्रा डॉ व्ही जी शिंदे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व डॉ. बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था गिताच्या सामूहिक गायनाने करण्यात आली .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. जी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना डॉ बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल व उपलब्धीवर प्रकाश टाकला. प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ जयसिंगराव देशमुख यांनी डॉ बापुजी साळुंखे यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान याविषयी विचार व्यक्त केले. यानंतर माजी न्यायमुर्ती पी बी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना यशप्राप्ती चा मूलमंत्र दिला. जिद्द,सातत्य, चिकाटी व परिश्रम यांच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करणे शक्य असल्याचे सांगत विधी क्षेत्रांतील त्यांचा अनुभव व विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करणे टाळावे या विषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी समाजाच्या प्रगतीमध्ये सुशिक्षित तरुणांचे महत्त्व व विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासा संदर्भाने मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी डॉ संजय आंबेकर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर्फे पीएचडी गाईड शीप प्रदान करण्यात आली असल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा चंदनी घोगरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज प्रधान व ज्ञानेश्वरी जाधवर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ पौर्णिमा दागदिया यांनी केले.यावेळी डॉ नितीन कुंभार, डॉ इक्बाल शाह, डॉ स्मिता कोल्हे, प्रा अजित शिंदे, प्रा सोनाली पाटिल, प्रा कैलाश शिकारे , डॉ दिपाली बारकुल तसेच कार्यालयीन कर्मचारी संभाजी बागल, संजय क्षिरसागर, बशीर अत्तार,राहुल ओव्हाळ यांच्यासमवेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.