जामीन मात्र अटी पुर्ण करेपर्यंत जेलवारी – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना दिलासा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी कोर्टाने जामीन मंजुर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन दिलेल्या अटी पुर्ण केल्यावर त्याची सुटका होणार आहे, तोपर्यंत त्यांचा मुक्काम धाराशिव जेलमध्ये असणार आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने 4 एप्रिल रोजी यलगट्टे यांना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून अटक केली होती तेव्हापासुन ते फसवणूक, भंगारचोरी व अट्रॉसिटी अश्या वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झाली आहे.
यलगट्टे यांना 50 हजार रुपयांचे 2 वेगवेगळे ऐपतपत्र देणेसह पासपोर्ट धाराशिव पोलिसांना देणे, परवानगीशिवाय देशसोडून ण जाणे, दर शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, 2 जवळच्या नातेवाईक यांचे पत्ते देणे यासह अन्य अटी टाकल्या आहेत.