उस्मानाबाद – समय सारथी
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्याप्रकरणी जामीन अर्जावर आज सोमवारी सुनावणी होणार असुन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान लाखोंची लाच घेणाऱ्या राशीनकर यांच्या घरझडतीत अहमदनगर येथे काय काय सापडले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लाखोंची लाच घेणाऱ्या राशीनकर यांच्याकडे पैसे जिरवण्याची एक वेगळी यंत्रणा कार्यन्वित होती असेच म्हणावे लागेल. राशीनकर लाच प्रकरण नंतर देखील महसूल विभागातील इतर कार्यप्रणालीत कोणताही बदल झालेला दिसत नाही, सगळे लाचखोरीचे व्यवहार दलालामार्फत सुरळीत चालू असल्याचे बोलले जात आहे.
भूम कोर्टाने या दोन्ही आरोपींची 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. उपविभागीय दर्जाचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्हा प्रशासनाची पोलखोल झाली आहे. राशीनकर यांच्या लाचेच्या रकमेत वाटेकरी कोण ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
जिल्ह्यात दगड,माती ,मुरूम वाळू असे गौण खनिज,स्टोन क्रशर,वीट भट्टी यासह अन्य कामे विनाकारवाई सुरू ठेवण्यासाठी किमान दरमहा १२ ते १५ कोटींची रक्कम महसुल विभागातील विविध अधिकारी हे हप्त्याच्या स्वरूपात घेत असल्याची चर्चा आहे.यावर कोणाचेही नियंत्रण दिसुन येत नाही.