जागतिक ग्राहक दिनानिमित्त विधी महाविद्यालयात वृक्षारोपण
संकल्पना – स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील डॉ बापूजी साळुंके विधी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे हक्क यावर जनजागृती व वृक्षारोपण करण्यात आले.प्रा डॉ तापडिया यांच्या संकल्पना व पुढाकारातून विधी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनी परिसरात झाडे लावून वृक्षसंवर्धन करण्याचा निर्धार केला.यावेळी प्रा डॉ पुनम तापडीया यांनी ‘पर्यावरणशास्त्र व मानवी जीवन’ या विषयावर मार्गदर्शन करीत पर्यावरणात वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्व विषद केले. वड, पिंपळ यासारखी महावृक्ष लागवड करावी असे सांगितले.
ग्राहकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या 2023 च्या जागतिक ग्राहक हक्क दिनाची संकल्पना ‘स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण’ अशी आहे त्या संकल्पनेनुसार विधी महाविद्यालयात वृक्षलागवड करण्यात आली.
जागतिक ग्राहक हक्क दिन 1983 मध्ये अस्तित्वात आला.अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या प्रेरणेतून सर्वप्रथम 15 मार्च 1983 रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन पाळण्यात आला होता. भारतात सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 9 डिसेंबर 1986 पारित केला ज्यामध्ये काही मूलभूत ग्राहक अधिकारांची रूपरेषा दिली आहे ती डॉ तापडिया यांनी समजावून सांगितली.
ग्राहक शिक्षण अधिकार,ऑनलाईन तक्रार निवारणासाठीचे अधिकार,माहितीचा व सुरक्षितचेचा हक्क,न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आणि निवडीचा हक्क यावर डॉ तापडिया यांनी माहिती देत त्याचे कश्या प्रकारे कायदेशीर संरक्षण करता येत हे सांगितले. महाविद्यालयातील पंडागळे यांनी विविध झाडे आणली व त्याचे विद्यार्थी यांनी रोपण केले यावेळी प्राचार्य व्ही जी शिंदे, प्रा नितीन कुंभार यासह शिक्षक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थीनी सहभाग घेतला.