जम्बो रुग्णालय उभारण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी – आमदार कैलास पाटील
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णाची व्यवस्था व्हावी यासाठी उस्मानाबाद येथे ५०० खाटांचे तर कळंब या तालुक्याच्या ठिकाणी २०० खाटांचे जम्बो रुग्णालय तात्काळ उभे करावे अशी मागणी शिवसेनेचे उस्मानाबाद – कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. हे रुग्णालय तात्काळ उभे केल्यास रुग्णाची मोठी सोय होणार आह. व रुग्णाची देखभाल करणे सोपे जाणार आहे तरी जम्बो रुग्णालय सुरु करण्याबाबत संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्हयात सध्या कोरोना वाढला असून उस्मानाबाद तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे त्यामुले तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.