उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रविवारी जनता कर्फ्यु बाबत अनेक संभ्रम असून प्रशासनाने कोणताही बंद किंवा कर्फ्यु आज जाहीर केलेला नाही त्यामुळे बाजारपेठ , दुकाने व इतर आस्थापना या प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सुरू ठेवता येऊ शकतील, प्रशासनाचे बंद बाबत कोणतेही निर्बंध नाहीत. दुकाने सुरू ठेवल्यास कोरोना नियमांचे पालन मात्र बंधनकारक आहे.
ज्या भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत व त्या भागाला अधिकृत कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे त्या भागात मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्वीच्या नियमाप्रमाणे बंद राहतील.
मात्र कोरोना काळात संसर्ग नको यासाठी एक कर्तव्य म्हणून एक दिवस सार्वजनिक बंद पाळून कोरोना योध्यचा सन्मान करावा या भूमिकेतून उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने दर रविवारी दुकाने बंद म्हणजे कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला आहे, सर्व दुकाने आठवड्यातून एकदा साप्ताहिक सुट्टी म्हणून बंद असतात मात्र एकाच दिवशी म्हणजे रविवारी दुकाने बंद करण्याचा निर्णय व्यापारी संघाने घेतल्याचे अध्यक्ष संजय मंत्री, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव , उपाध्यक्ष संजय मोदानी यांनी केले आहे