आमदार चौगुले यांचा गुवाहाटीतुन संवाद – स्वखुशीने आलो, रवींद्र गायकवाड यांचा उल्लेख
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा-लोहारा मतदार संघांचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांचे गुवाहाटी येथून एक व्हिडिओ पाठवला असून त्यात त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच हिंदूत्व जोपासनारा माणूस आहे. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वखुशीने आलो आहे.माझे राजकीय गुरु रवींद्र गायकवाड असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओ मध्ये केला आहे.एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही माझ्याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती त्यांनी केली आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणत त्यांनी याचा शेवट केला आहे.
मी गेली 30 वर्ष शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करीत आहे. मी माझे राजकीय गुरु रवींद्र गायकवाड, गटनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आलो आहे.मी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आलोय असे सांगितले आहे. रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आलोय असा खळबळजनक गौप्यस्फ़ोट केल्याने खळबळ उडाली आहे तर गायकवाड यांचा चौगुले यांना पाठविण्यात हात होता का यावर चर्चा यनिमित्ताने सुरु झाली आहे.
गायकवाड यांनी याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही तर दुसरीकडे चौगुले यांच्याशी विरोधात काही ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते.