चुलीवर भाकरी करून वाढत्या महागाईचा निषेध , टाळ वाजवीत काढला मोर्चा
महिला आक्रमक – भाजलेल्या भाकरी पंतप्रधान मोदी यांना पोस्टाने पाठविल्या
महिला विभागीय अध्यक्ष वैशाली राहुल मोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन
परांडा – समय सारथी , किरण डाके
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करीत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल,डिझेल,गॅस , भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने महिलांनी टाळ वाजवीत मोर्चा काढला व जोरदार घोषणाबाजी केली.
महागाई वाढल्याने महिलांनी भर चौकात चुल मांडली व त्यावर भाकरी तयार केल्या या भाजलेल्या भाकरी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पाठविण्यात येणार आहेत. यावेळी गॅस दर वाढल्याने गॅसला हार घालण्यात आला व निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांनी बाजारात जाऊन शेतकरी व सामान्य नागरिक यांची भाव वाढ बाबत विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागीय अध्यक्ष वैशाली राहुल मोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मंहगा तेल .. मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय … अशा केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. घरगुती वापराच्या व सीएनजी गॅस सिलिंडरचे दर खूपच वाढले आहेत. रोज वापर होणाऱ्या पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतीही हैराण करणाऱ्या आहेत. देशातील वाढणारी महागाई व बेरोजगारीमुळे तरुणाचे जीवन जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे गृहिणींवर आज पारंपरिक पद्धतीने लाकूड फाटा व गवरीवर स्वयंपाक करण्याची वेळ गामीण भागात आली आहे याचा निषेध म्हणून परंडा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने चुलीवर भाकरी केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर,महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सौ. श्वेता सागर दुरुगकर, युवती जिल्हा कार्याध्यक्ष संगीता काळे,युवती जिल्हाध्यक्षा स्वाती ध्रुवकर यांनी महागाई विरोधात भाषणे करून निषेध केला यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत गॅस दरवाढीचा आणि महागाईचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तिच्या फोटोला शाई फासून जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेेस समाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, मजूर फेडरेशन संचालक धनंजय हांडे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष वाजिद दखनी, मनोज कोळगे, मजूर फेडरेशन संचालक बापू मिस्कीनमाजी नगरसेवक संजय घाडगे, सरफराज कुरेशी, बाबू जिनेरी, बच्चन गायकवाड,आप्पा बनसोडे,समीर मदारी,मलिक सय्यद,राजकुमार माने,मोहसीन सौदागर,आमोल काळे, बाळासाहेब बैरागी, प्रा शरद झोबांडे,महावीर खूने,राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष जावेद मुजावर,माजी जिल्हा परिषद सदस्या सूनिता जाधव, माजी पंचायत समिती सुषमा शिंदे, माजी नगरसेविका रत्नमाला बनसोडे, माजी नगरसेविका संजना माने, यशस्वीनी अभियानचे तालूका समन्वयक राखी देशमुख, भूम तालूका अध्यक्ष उषा गटकूळ, कळंब तालुका अध्यक्ष स्वाती भातलंवडे, संरपच सुनिता हांडे, रशीदा सय्यद, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सलमा सौदागर,दिपाली रगडे,वैष्णवी बैरागी,अनिता राऊतसह शेकडो महिला व युवती कार्यकर्त्या उपस्थित होत्या.