चिंता वाढली ? युएईहुन बावी येथे आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह
ओमीक्रॉन अनुषंगाने तपासणी होणार – बावी गावात उपाययोजनांची गरज
उस्मानाबाद – समय सारथी
शारजा,युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडली होती. या तरुणाच्या संपर्कातील आणखी 2 जण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील बावी या गावातील 13 व 20 वर्षीय महिला यांची तपासणी केल्यावर त्या पॉझिटिव्ह सापडल्या. ओमीक्रॉन अनुषंगाने या रुग्णाचे नमुने जिनोम तपासणीसाठी एनआयव्ही ला पाठविण्यात येणार आहेत. बावी येथील तरुण परदेशातून प्रवास करून आल्यानंतर त्याच्या संपर्कात कोण कोण आले ? हे पाहणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे.बावी गावात आता तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व इतर उपाययोजना होणे गरजेचे आहे.
शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण सापडले तर 1 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी 1 हजार 766 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकीव
6 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, हा दर 0.33 टक्के आहे. 6 पॉझिटिव्ह रुग्णपैकी 2 बावी, उमरगा तालुक्यातील 2 त्यात कसगी व चंद्रकल तुळजापूर व उस्मानाबाद शहरातील कोहिनूर हॉटेल जवळील 2 जणांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 65 हजार 608 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के आहे तर 67 हजार 708 पैकी 1 हजार 505 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 2.22 टक्के इतके आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 1505 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.