चिंताजनक – कोरोनाचे जिल्ह्यात रुग्ण वाढले, 34 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 10 रुग्ण सापडले तर 34 रुग्ण सक्रिय आहेत.
गुरुवारी 969 नमुने तपासण्यात आले त्यापैकी रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण 1.03 टक्के राहिले. आजवर कोरोनाचे 74 हजार 221 रुग्ण सापडले त्यापैकी 1 हजार 538 रुग्णचा मृत्यू झाला, रुग्ण मृत्यूचे प्रमाण हे 2.07 टक्के राहिले तर 72 हजार 69 रुग्ण बरे झाले, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.11 टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी 10 रुग्ण सापडले त्यात उस्मानाबाद तालुक्यात 1, उमरगा 4 व कळंब तालुक्यात 5 रुग्ण सापडले.20 जूनला 2, 21 जूनला 5, 22 जूनला 8 व 23 जूनला 10 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्यात रोज वाढ होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन दक्ष व सज्ज झाले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी व प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे