गुटखा बनविण्यासाठी लागणारे 96 लाखांचे साहित्य केला, 2 आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखा व तुळजापूर पोलिसांची कारवाई
तुळजापूर – समय सारथी
पोलीस स्टेशन तुळजापूर व स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी संयुक्त कारवाई करीत गुटखा बनविण्यासाठी लागणा रा 96 लाख रुपयांचा साठा व ट्रक असा 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आला असून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल रोेटे, पोना राऊत, पोना माळी, पोकॉ सोनवणे, पो.कॉ. भोपळे तसेच स्थानिक गुन्हे शाखचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोना सय्यद, पोना चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.
तुळजापूर ते उस्मानाबाद रोड वरील उडडाण पुलाखाली एक अशोक लिलॅण्ड ट्रक क्रमांक केए-32-सी-3731 या वाहनास थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ साठा सुगंधी सुपारी 55 किलोचे पांढरे पोते, संख्या 290 त्यांची किंमत रुपये 81 लाख 95 हजार, गुटखा बनवण्यासाठी लागणारी लावडर 40 किलोचे पांढरे पोते संख्या 119 त्याची किंमत रुपये 14 लाख 28 हजार असा सर्व साठा एकूण किंमत 96 लाख 23 हजार प्रतिबंधीत अन्नपदार्थ साठा आढळून आला. भिमशहा गुरूशांतअप्पा घोगी (26 वर्षे) पत्ता रा. लिंगदल्ली किण्णी ता. बसवकल्याण जि. बिदर (ट्रक ड्रायव्हर), महंमद अलताफ बाबुमिया सवार (38 वर्षे) रा. दुबलगुंडी ता. हुमनाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक (ट्रक किन्नर) यांना अटक केली आहे.
पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा रजि.नंबर 61/2022 भादवी कलम 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 20 (2)(ळ) व 26 (2) (र्ळीं), 27(3) सह वाचन कलम 30(2) अ सह वाचन अधिनियम 2011 चे नियमन 2.3.4 नुसार गुन्हा नोंद दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे नेमणुक पोलीस स्टेशन तुळजापूर हे करीत आहेत.