गाण्याची मैफिल, रंग दांडियाचा – लेडीज क्लब येथे तुफान गर्दी
नृत्य सादरीकरण व सेल्फीसाठी झुंबड – गौरी गणपती देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण
उस्मानाबाद – समय सारथी
गाण्याची मैफिल, रंग दांडियाचा हा दुसऱ्या दिवशीही कायम राहिलेला पाहायला मिळाला, लेडीज क्लब येथे उस्मानाबादकरानी तुफान गर्दी केली. फुलला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकर व हर्षद केतकरी या दोघांनी दांडियाला हजेरी लावल्याने फुलला सुगंध उत्साहाचा व जल्लोषचा असेच वातावरण होते. दांडिया महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोठी गर्दी झाली त्याने कालचा रेकॉर्ड मोडीत काढला. या कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करण्यात आले तर सेल्फीसाठी तरुणाईची झुंबड उडाली.
सुरुवातीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते भवानी पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित केलेल्या गौरी गणपती देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात उत्तेजनार्थ, यशस्वी स्पर्धक व परीक्षक यांचा सन्मान करण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम प्राजक्ता गायकवाड व सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात विविध समाज उपयोगी, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्यात दांडिया महोत्सवाला एक वेगळी परंपरा आहे ती यावर्षी कायम राखली. उस्मानाबाद येथे सर्वप्रथम दांडिया घेण्यास अर्चना पाटील यांनी सुरुवात केली. बेस्ट कपल व बेस्ट ड्रेससाठी प्रत्येकी 5001 रुपये तर दांडिया कवीन व दांडिया किंग यासाठी प्रत्येकी 10,001 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाना विना मूल्य मोफत प्रवेश असणार आहे तरी महिला व नागरिकांनी याचा लाभ घेत यात सहभागी व्हावे असे आवाहन अर्चना ताई पाटील यांनी केले आहे.
गौरी सजावट बक्षीस वितरण –
गौरी सजावट स्पर्धेत प्रथम विजेत्या इंदुमती हरीशचंद्र पवार यांच्या आदर्श ग्राम व जलयुक्त शिवार याला 10,001 रुपये , द्वितीय पुरस्कार कल्पना अंकुश लोकरे यांच्या महाशिवरात्री देखाव्याला 7001 रुपये , तृतीय पारितोषिक निकिता सचिन पेठ व काकासाहेब पेठे यांच्या आई कुठे काय करते या देखाव्याला 5001 देण्यात आला. उत्तेजनार्थ अनुपमा बोरफळकर, सोनाली प्रवीण मंडलिक, डॉ मनीषा गुणवंत जाधव, रेणुका प्रीतम बागल, दीपाली संतोष पंडीत यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते देण्यात आला तर परीक्षक राजेंद्र आत्रे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते.