गांजा तस्कराला विटा येथे अटक – उस्मानाबादचे सुपुत्र सपोनि संदीप शिंदे यांची कामगिरी
उस्मानाबाद – समय सारथी
सांगली स्थानिक गुन्हे शाखा व विटा पोलिसांनी संयुक्त कामगिरीने विटा कराड नाका येथे 10 किलो गांजासह एका तस्कराला अटक केली आहे. उस्मानाबादचे सुपुत्र सहायक पोलीस निरीक्षक संदीप रंगराव शिंदे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
पोलीस महासंचालक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी विशेष मोहीम उघडली असून यात गांजा विक्री करणारे, गांजाची लागवड करणारे तस्कर यांचा शोध घेण्यास आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांच्या गोपनीय माहिती नुसार व खबऱ्या मार्फत माहिती घेऊन एका गाडीत गांजा येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गोरख पवार याला सापळा रचून रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 4 पॉकेटात गुंडाळलेला गांजा पकडला त्याची किंमत 2 लाख ररुपये असून गुन्ह्यात वापरलेली कार असा साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विटा पोलिसात पवार याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.