खुल्या जागेतील बांधकाम पाडा – निंबाळकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील नगर परिषद हद्दीतील ओपन स्पेस मधील सार्वजनिक व रस्त्यावरील जागेत केलेले बांधकाम पाडण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी उदय निंबाळकर यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे केली आहे. कारवाईसाठी नगर रचना अधिकाऱ्यास पोलीस संरक्षण व बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी व इतर वाहने उपलब्ध करुन द्यावीत. या प्रकरणात बांधकाम पाडून खुली जागा पूर्ववत करण्यासाठी दिरंगाई केल्यास कारवाईची मागणी केली आहे.
नियमबाह्य व अर्थपूर्ण व्यवहार झालेल्या या प्रकरणात कारवाई होते का हे पाहावे लागले.याचं प्रकरणात यलगट्टे यांच्यावर गुन्हा नोंद होऊन जेलवारी सुद्धा झाली आहे त्यामुळे इतर अधिकारी त्यातून बोध घेणार का हे पाहावे लागेल. दरम्यान एका कर्मचाऱ्याला कायदेशीर प्रक्रियेसाठी प्राधिकृत केल्याचे कळते मात्र फाईल लाल फितीच्या कारभारात अडकली आहे.
धाराशिव नगर परिषद हद्दीमध्ये पोलिस मुख्यालयासमोरील सर्व्हे नंबर 145/5 मध्ये छत्रपती हौसिंग सोसायटीमधील मंजुर रेखाकनातील प्रसाद रंगनाथ पाटील व पुजा प्रसाद पाटील हे खुल्या जागेत आणि अंतर्गत रस्त्यावर बांधकाम करीत असल्याची तक्रार उदय निंबाळकर यांनी केली होती. मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी संगनमत करुन ऑफलाईन परवानगी दिल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.
संचिका उपलब्ध होत नसल्याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 51 नुसार कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त सतीश शिवणे यांनी आदेशीत केले होते त्यानुसार कलम 420, 465,484 अन्वये 16 मार्च रोजी आनंद नगर पोलीस ठाण्यात यलगट्टे यांच्या गुन्हा नोंद झाला होता.