विद्यार्थ्यांनी यश मिळविले की त्यांना पैसे देऊन फोटो छापतात
आदर्श संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मांडले मार्केटिंगचे वास्तव
उस्मानाबाद – समय सारथी
काही खासगी कोचिंग क्लासच्या कार्यपद्धतीवर आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी खळबळजनक आरोप करीत शिक्षण व्यवस्थेतील व कोचिंग क्लासच्या मार्केटिंगचे वास्तव मांडत आरोप केले. आमच्या भोसले हायस्कुल व कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत यश मिळविले की त्यांना पैसे देऊन काही खासगी कोचिंग क्लासेस तो विद्यार्थी त्यांच्या इथे शिक्षण घेतल्याचा व त्यामुळेच यश संपादन केल्याचा फोटो छापतात. कोचिंग क्लास त्यांचे मार्केटिंग व्हावे व इतर विद्यार्थी त्या ठिकाणी क्लासला येण्यासाठी आकर्षित होण्यासाठी हा मार्ग वापरतात असे पाटील म्हणाले. आमचा या प्रकाराला विरोध नाही किंवा आजवर विरोध केला नाही मात्र हे प्रकार चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी खरच तो यश मिळालेला विद्यार्थी त्या ठिकाणी होता का याची खात्री करावी, त्यांच्या समोर सत्य येईल. खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणारे सुद्धा शिक्षक आहेत त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करीत असतो व त्यांना विरोध करीत नाही.
काही क्लासेस यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 50 हजार ते लाख रूपये देतात, त्यातून त्या विद्यार्थीला चार पैसे मिळतात व पुढील शिक्षणाला मदत होते हा जरी यातील भाग असला तरी तो चुकीचा आहे असे पाटील म्हणाले. उस्मानाबाद येथे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. विद्यार्थीला यश मिळाले की त्याच्याशी नातेवाईक व इतर माध्यमातून संपर्क करायचा आणि त्याचा सत्कार करून तेच फोटो सोशल मीडिया व क्लासेसच्या बॅनरवर छापून मोकळे व्हायचे हा प्रकार असून अशाने विद्यार्थीचे यश पळवीता येत नाही असा आरोप पाटील यांनी केला. यशस्वी विद्यार्थी आमचाच याची चढाओढ व रस्सीखेच सुरू आहे. भोसले कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आयआयटी परीक्षेत यश मिळाले म्हणून त्यांचा व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यासाठी सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, या पत्रकार परिषदेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले मार्केटिंगचे वास्तव सांगत खळबळजनक आरोप केले. यानंतर ते कोचिंग क्लासेस कोणते याची चर्चा होत आहे.
उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजने IIT प्रवेशाच्या जेईई परीक्षेत मोठे यश मिळविले असून यशवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.उस्मानाबाद येथील नामांकित श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत मोठे यश मिळविले आहे. अमेय भिरंगे या विद्यार्थ्यांने पहिल्याच प्रयत्नात IIT ची जेईई परीक्षा पास झाला असून या कॉलेजमधील 6 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यातील 4 जण हे उत्तीर्ण झाले आहेत त्यात तनया दहातोंडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर शिक्षक संजय मिश्रा,ममता देवी मिश्रा,योगेश मिश्रा व ब्रिजमोहन पासवान या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या संकटात ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रम व अडचणींवर मात करीत हे यश मिळविले असून आगामी काळात उस्मानाबादला शैक्षणिक हब व वेगळा उस्मानाबाद पॅटर्न बनविणार असल्याचा मानस आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केला.
उस्मानाबाद येथील विद्यार्थ्यांची आकलनशक्ती , उत्सुकता ही चांगली आहे तसेच हे विद्यार्थी लक्ष देऊन , मन लावून अभ्यास करतात त्यामुळे आगामी काळात इथला विद्यार्थी यशाची सर्वोच्च शिखरे पार करील असे मत शिक्षक मिश्रा यांनी व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शेजारील लातूरसह अन्य जिल्ह्यात शिक्षनासाठी न जाता भोसले कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे मत विद्यार्थीनी व्यक्त केले.
डोनेशन बंद करा मग आरोप करा