खरे गद्दार तुम्ही, विचारधारा सोडून दिली तुम्हाला लाज वाटायला हवी
आरोग्यमंत्री डॉ सावंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
उस्मानाबाद – समय सारथी
विचारांचा वारसा असतो त्याला रक्ताचे नाते आवश्यक नाही, कोणीही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे याचे विचार पुढे घेऊन जाऊ शकतो, आम्ही खरी शिवसेना असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. तुम्ही विचारता बाळासाहेब याचे फोटो का लावता म्हणून, मग मी विचारतो तुम्ही माझ्या शिवबांचे नाव का लावता, तो अधिकार तुम्हाला कोणी दिला असे सांगत आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला हवी. गद्दार आम्ही नसून खरे गद्दार तुम्ही आहेत, ठाकरे गटाच्या नेत्यांनी यापुढे बोलताना शिस्तीत बोलावे तसेच भान ठेवून बोला आम्हाला काहीही करता येते. स्टेजवर या समोरासमोर मग सांगू काय खरे व काय ते खोटे असे सांगत त्यांनी खुले आव्हान मंत्री सावंत यांनी दिले. ते हिंदूगर्वगर्जना मेळाव्यात बोलत होते, यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार ज्ञानराज चौगुले,माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा बँकेचे संचालक केशव सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, प्रशांत बाबा चेडे, संजय गाढवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता आल्यावर उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगणारा मी पाहिला मंत्री आहे, मी त्या दिवशी पासून मातोश्रीची पायरी चढणार नाही असे सांगितले व चढलोही नाही. मी लाचारी पत्कारणारा नाही. उद्धव ठाकरे 2 दिवस दिल्लीत जाऊन मोदी यांना भेटले असते तर सत्ता मिळाली असती मात्र उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात वेगळे वारे वाहत होते. 2019 साली शिवसेना निवडणुका भाजप सोबत एकत्र लढलो, प्रचार बॅनरवर दोन्हीकडील नेत्यांचे फोटो लावले, एकत्र वचननामा जाहीर केला व मते मागितली मात्र त्यांना अचानक झटका आला व काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर सत्तेसाठी जाऊन बसले, महाविकास आघाडी सरकार जनतेला आम्हाला आवडले नाही असे सावंत म्हणाले.
उस्मानाबादचा आजचा कार्यकर्ता बैठक ही एक चुणूक आहे. मेळावा काय असतो हे आगामी काळात दिवाळीनंतर भव्य मेळावा घेऊन दाखवितो असे सावंत म्हणाले. सत्ता आली मात्र ती कुणासाठी चालवली गेली याचे आत्मचिंतन करायला हवे. मी 2016 पासून पोटतिडकीने सांगत आहे हे सगळं मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले.गेली 40 वर्ष शिवसैनिकांनी काठ्या लाठ्या खाल्ल्या, प्रसंगी जेल हद्दपारी भोगली मात्र त्याचा स्वाभिमान पायदळी तुडावीला गेला म्हणून आज ही सत्तातरणची वेळ आली. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली 25-30 वर्ष फारकत घेतली गावातील स्थानिक वादामुळे इतकी कटुता आली आहे की सोयरीक सुद्धा होत नाही असे असताना हातमीळवणी केली.
मराठा आरक्षण 2024 पर्यंत देणार, जाती जातीत वाद घालण्याचे षडयंत्र
मराठा क्रांती मोर्चावेळी मुका मोर्चा म्हणून टीका केली तेव्हा ते गप्प का होते. वेळ आली तर आरक्षणसाठी सत्ता सोडेल राजीनामा देईल पण आरक्षण घेणारच असे ते म्हणाले.2024 पर्यंत आरक्षण टिकेल असे आरक्षण देणार आहे. तुम्ही कोण ठरवणार आरक्षण कुठून द्यायचे ते, ओबीसी प्रवर्गमधून आरक्षण असे सांगात जाती जातीत भांडणे लावली जात आहेत.मराठ्यांचे रक्त पिण्याचे काम आजवर केले गेले. आपल्याला आरक्षण मिळेल, आम्ही तिथे सत्तेत बसलो आहेत असे सावंत म्हणले. मी मंत्री मंडळात असतो मात्र पाणी देणार ही घोषणा केल्याने षडयंत्र करुन डावलले गेले. सगळे पाणी बारामतीला वळवण्याचा प्रयत्न होता होता. अख्खा धरण राज्यचे सिंचन बारामतीत घेऊन जाणार आहोत का मात्र आम्ही तुम्हाला हे पचू देणार नाही.भले सत्तेतून हद्दपार होऊ मात्र शिवसैनिकांचा स्वाभिमान घाण ठेवणार नाही असे सांगत त्यांनी आश्वासन दिले.माझ्या कुटुंबातील कोणी ठेकेदारीचे काम घेतले तर राजीनामा देतो असे ते म्हणले.
खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका
मंत्री सावंत यांनी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांच्यावर टीका केली. गुत्तेदारी काका मामा यांना द्यायची हे सगळे हद्दपार करणार असून सर्व विकास कामे ही देताना शिवसैनिकाला केंद्रस्थानी ठेवून देणार आहे. माया कामाविण्याची ही इतकी स्वार्थी भोगवादी वृत्ती का ? माझं चुकल, मी 2024 ची वाट पाहतो आहे या दोघांना त्यांची जागा दाखवून देतो. माझं मीठ आळणी, मी मदतीचा हात दिला की त्याचा गैरफायदा घेतात. 1988 सालीपासून शिवसेना आमच्या घरात आहे आणि हे निष्ठावान कट्टरतेची भाषा करतात. खासदार ओमराजे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते कैलास पाटील यांना शिवसेनेची नाव असलेली चार अक्षरे सुद्धा माहित नव्हती. एकदा संधी दिली की ओमराजे यांनी तेरणा कारखाना मोडून खाल्ला त्यांना भंगार सुद्धा खायला पुरले नाही मग तुमचे दायित्व काय? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. हे शासकीय अधिकारी याच्याकडून हप्ते गोळा करतात्त ही वृत्ती नको हे बंद करायचा आहे ठेचून काढू असे सावंत म्हणाले. नेत्यांनी स्वतः गुत्तेदारी, भ्रष्टाचार केल्याने कार्यकर्त्यांचा विकास झाला नाही.जिल्ह्याचे मागासपण जाण्यासाठी त्यांनी काय केले हे सांगावे असे सावंत म्हणाले. तेरणा कारखान्यात मोळी पडेल मात्र त्यात या लोकांनी राजकारण केले.तेरनेच्या सभासदाच्या दारात जाल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल काय केले असे सावंत म्हणले.