कौटुंबिक जबाबदारी – आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी 4 मुलींचे घेतले पालकत्व
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील 4 मुलीचे पालकत्व आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी घेतले असून या मुलींच्या शिक्षणासह इतर जबाबदारी घेतली. सारोळा येथील शेतकरी नागेश सुरवसे यांचा काम करीत असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते या सुरवसे कुटुंबात 4 मुली असल्याने त्यांचे शिक्षण, लग्न व भविष्याची चिंता सतावत होती अश्या संकटात आरोग्य मंत्री सावंत यांनी या कुटुंबाचे पालकत्व घेत जबाबदारी स्वीकारली. यापुढे या 4 ही माझ्या भाच्ची असून त्यांची मी जबाबदारी घेतो असे सांगत मनीषा ताई आता यापुढे काळजी करू नका असे सांगत धीर दिला.
सुरवसे कुटुंबीय हे उस्मानाबाद येथील राम नगर राहत होते त्याची व्यथा सनी पवार यांनी मंत्री सावंत यांच्याकडे मांडली. त्यावेळी सावंत यांनी जबाबदारी घेतली. यावेळी धनंजय सावंत, केशव सावंत, डॉ सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, दत्ता साळुंके, जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, अविनाश खापे, अजित लाकाळ यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी यापूर्वी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कै दिलीप जावळे कुटुंबाचे पालकत्व स्वीकारत 10 लाखांची मदत केली होती तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षण व नौकरीची जबाबदारी घेतली होती.