कोरोना संसर्ग वाढला – आज 176 कोरोना रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात 1191 कोरोना बाधित रुग्ण
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 176 नवीन रुग्ण सापडले असून त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 86 तर कळंब तालुका 12 व उमरगा तालुक्यातील 20 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1191 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उस्मानाबाद तालुक्यातील 86 पैकी 63 रुग्ण हे एकट्या उस्मानाबाद शहरातील आहेत त्यामुळे कडक निर्बंध राबविणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी 174 ऍक्टिव्ह रुग्ण होते त्यातुलनेत 24 मार्चला रुग्ण संख्या 1191 झाली असून 6.84 पटीने वाढ झाली आहे. मराठवाड्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात लॉकडाउन घोषित केला आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 48 हजार 468 नमुने तपासले त्यापैकी 19 हजार 064 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 14.78 टक्के आहे. जिल्ह्यात 17 हजार 283 रुग्ण बरे झाले असून 90.66 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 590 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.09 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 86 रुग्ण , तुळजापूर 17, उमरगा 20, लोहारा 10, कळंब 12 , वाशी 10, भूम 05 व परंडा तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176