कोरोना वाढतोय – धाराशिव जिल्ह्यात एका दिवसात 41 रुग्ण सापडले, उमरगा पुन्हा हॉटस्पॉट
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत असुन एका दिवसात तब्बल 41 नवीन रुग्ण सापडले आहेत. 41 रुग्णापैकी 23 रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत त्यामुळे उमरगा पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे.
8 एप्रिल रोजी 300 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 41 म्हणजे 13.67 टक्के नमुने पॉझिटिव्ह सापडले हे प्रमाण वाढले आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 81 सक्रीय रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
उस्मानाबाद तालुक्यात आज 4 रुग्ण, लोहारा 5, कळंब 4 वाशी तालुक्यात 5 तर तुळजापूर, भुम व परंडा तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. कोरोनाने बरे होण्याचे प्रमाण हे 97.11 टक्के आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटेची सुरुवात उमरगा तालुक्यातून झाली होती, आताही चौथ्या लाटेचे संकेत दिले असताना उमरगा येथे रुग्ण सापडत असल्याने पुन्हा एकदा उमरगा हॉटस्पॉट ठरत आहे.