कोरोना लस – 13 मे चे लसीकरण बुकींग रद्द , अनेक नागरिकांना SMS
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या 13 मे रोजी ऑनलाइन बुकिंग केलेल्या सर्व लसीकरण केंद्रावरचे लसीकरण रद्द करण्यात आले असून त्याबाबतचे SMS स्लॉट बुकिंग केलेल्या नागरिकांना मोबाईलवर येत आहेत त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. लसीकरण स्लॉट ओपन करून ऑनलाईन बुकिंग करण्यात आली व त्यांनतर लस उपलब्ध असतानाही स्लॉट बुकिंग रद्द करण्यात आल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लसीकरण बाबत स्पष्टीकरण येणार असल्याचे कळते
आज उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर 11 ठिकाणी 45 वर्ष वरील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार होता मात्र यावेळी 3 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लसीकरण केंद्रात गर्दी केल्याने प्रशासनाचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभार समोर आला यावर माध्यमातून बरीच टीकाही झाली. अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तासोनतास रांगेत उभे होते मात्र त्यांना लस मिळाली नाही.