कोरोना लस पुन्हा संपली – मोहीम ठप्प, लसीची प्रतीक्षा
प्रशासनाला पत्रव्यवहारात, लोकप्रतिनिधीना आरोप प्रत्यारोपात धन्यता
1 मे नंतरची नाव नोंदणी मात्र एकही केंद्र दाखवत नाही
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लस साठा पुन्हा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. 1 मे नंतर 18 वर्षाच्या पुढील सर्वांना नाव नोंदणी करून लस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे त्यानुसार आजपासून नाव नोंदणी होत आहे पण लस साठा नसल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील एकही केंद्र अँपवर दाखवत नाही. आज लस संपल्याने मोहीम बंद झाली असून जिल्ह्यात 1 लाख डोसची मागणी करण्यात आली आहे मात्र सध्या स्तिथी पाहता आगामी 2 दिवस तरी लस साठा उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय व आयुर्वेदिक कॉलेज येथे शिल्लक राहिलेले 300 ते 400 डोस देण्यात आले त्यांनतर लसीकरण बंद केले.
1 मे साठीची लस ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे मात्र कोविन अँपवर नोंदणी करताना उस्मानाबाद जिल्ह्यात एकही लसीकरण केंद्र दाखवत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या लस संपल्याने लसीकरण बंद आहे. लस उपलब्ध नसल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लस केंद्राची यादी कोविन अँपवर उपलब्ध नाही.
मराठवाड्यातील उस्मानाबाद वगळता इतर सर्व जिल्ह्यातील केंद्राची यादी व उपलब्ध लसीची संख्या ऑनलाईन दिसत आहे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात लस नसल्याने केंद्र व साठा दाखवत नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू असताना गरजेनुसार अगोदरच मागणी करूनही आवश्यक लस साठा उपलब्ध करून दिला जात नाही, जिल्हा प्रशासन पत्रव्यवहार करण्यात तर लोकप्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार या एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानत आहेत तर नागिरकाना लसीची प्रतीक्षा कायम आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास 153 लसीकरण केंद्र आहेत. त्यात 145 ठिकाणे ही शासकीय तर 8 खासगी रुगणलय आहेत.
Government- 145
District hospital- 2 sites
Govt Ayurvedic college-1
SDH- 4
RH- 6
PHC- 43
UPHC- 1
Subcenter – 88
Total Government sites-145
Private hospitals sites- 8