उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे तब्बल १० रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून रुग्णाच्या संख्येने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १०४ झाली असून त्यापैकी ४६ जण बरे झाले असून ५५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 3 जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत .
उस्मानाबाद शहरातील कोरोना रुग्ण सापडलेल्या उस्मानपुरा सांजा रोड भागातील रुग्णाच्या संपर्कातील ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथील १ आणि कळंब तालुकयातील शिराढोण येथील २ रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला सुरुवात झाली असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील १६ , लोहारा ६ व परांडा या तालुक्यात ११ रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात २१ रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका ३, वाशी तालुका ४ व उस्मानाबाद ३९, तुळजापूर येथे ४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे १ हजार ७८५ स्वॅब तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी १ हजार ५६४ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.