रुग्ण कमी झाले तरी प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे
कोरोना मुक्तीकडे वाटचाल – उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 23 सक्रीय रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होताना दिसत असून जिल्ह्यात सध्या कोरोनाचे केवळ 23 सक्रिय रुग्ण आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 9 नोव्हेंबर मंगळवारी केवळ 1 रुग्ण सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 पैकी 7 तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. कळंब तालुक्यातील एकुरगा येथे 37 वर्षीय पुरुष कोरोना बाधित सापडला आहे. गेल्या आठ दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज दहाच्या खालीच राहिली असल्याने एक प्रकारे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 67 हजार 568 रुग्ण सापडले त्यापैकी 65 हजार 473 रुग्ण उपचारानंतर बरे झाले त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के इतके होते तर 63 हजार 894 पैकी 1 हजार 494 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के इतके राहिले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 1 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला असून 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचारा दरम्यान झाले आहेत तर 107 रुग्ण हे हृदयविकार व इतर कारणाने मृत्यू झाले आहेत तर 108 रुग्ण पोस्ट गुंतागुंतीमुळे झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात 2 व 3 नोव्हेंबर रोजी दररोज 3 रुग्ण,4 नोव्हेंबरला 4 रुग्ण,5 नोव्हेंबरला 5,6 नोव्हेंबर 3,7 नोव्हेंबर 1 तर 8 नोव्हेंबर 2 रुग्ण सापडले.