कोरोना आढावा बैठक – आमदार डॉ तानाजीराव सावंत 2 दिवसाच्या दौऱ्यावर
सोलापूर , उस्मानाबाद जिल्ह्यात 12 व 13 मेला घेणार बैठका
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे 12 मे व 13 मे या दोन दिवसात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोना नियोजनबाबत पक्षीय व शासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचा आढावा घेणार आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन काढलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
आमदार डॉ सावंत हे 12 मे बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेतील यात सकाळी 11.30 वाजता पंढरपूर शासकीय विश्रामगृहात बैठक, दुपारी 2 वाजता मोहोळ तर सायंकाळी सोलापूर येथे बैठक घेतली.
13 मे गुरुवारी 11.30 वाजता परंडा शासकीय विश्रामगृहात भूम,परंडा वाशी येथील पदाधिकारी बैठक, दुपारी 2.30 वाजता उस्मानाबाद शासकीय विश्रामगृहात कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथील पदाधिकारी बैठक घेऊन कोरोना बाबत स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेतली व त्यानंतर या अनुषंगाने दुपारी 4.30 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.या दौऱ्यानंतर कोरोना उपाययोजना बाबत काय केले पाहिजे याचा अहवाल ते मुख्यमंत्री याना देणार आहेत.
1 हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर
बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात १००० खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू केले आहे त्याचे उदघाटन 7 मे रोजी नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.महिला रुग्णांसाठी १५० व पुरुष रुग्णांसाठी ८५० बेड्स उपलब्ध करुन दिले आहेत.या कोविड केअर सेंटरमध्ये १८ तज्ञ डॉक्टर्स, ४२ नर्सेस व ८० स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत.औषधेंसह अन्य उपचार संपुर्णपणे मोफत असून एक्स रे , कोविडच्या अनुषंगाने उपचार करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या 8 रक्त तपासणी मोफत केल्या जाणार आहेत. 2 वेळेस जेवण चहा , नाश्ता तसेच प्रशिक्षित योगा शिक्षकद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, प्रत्येक 3 रुग्णास शक्य आहे तो पर्यंत स्पेशल रूम देण्यात येणार आहे. बार्शी येथील या सेंटरमुळे उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची व्यवस्था होत आहे.