कोरोनाचे आज सर्वाधिक 24 बळी – मृत्यूच्या आकड्यांची हजारी पार
उस्मानाबाद जिल्ह्यात 813 रुग्ण तर 729 जण बरे
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग कायम असून आज एका दिवशी गेल्या 14 महिन्यात सर्वाधिक 24 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून कोरोना रुग्णांची संख्याने 1 हजारचा आकडा पार केला आहे. आजवर 1005 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून या आठवड्यात कोरोना मृत्यू संख्या 10 वरून थेट 24 वर गेली आहे, विशेष म्हणजे यात सारी रुग्णाच्या बळीची संख्या कळू शकली नाही त्यामुळे ती समाविष्ट नाही. आज 813 नवीन सापडले तर 24 जणांचा कोरोनाने बळी घेतला तर 729 रुग्ण उपचारनंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 7 हजार 252 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कायम असून दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढत असून त्यात तरुण गटातील रुग्णही मृत्यू होत आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना अनेक नागरीक अजूनही बेफिकीरपणे फिरत आहेत त्यांनी स्वयंशिस्त लावुन घेणे गरजेचे आहे. उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब तालुक्यात कोरोनाने थैमान घातल्याचे समोर येत आहे. कोरोनाने मृत्यू होण्याचा आकडा व रुग्ण सापडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे चिंता कायम असून संकट अजून टळलेले नाही. कोरोना सक्रिय रुग्णाची संख्या 7 हजार 252 झाली आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 548 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 265 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.आज 2 हजार 312 रॅपिड तपासणी करण्यात आल्या त्यात 548 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आज 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून *कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 1005 झाली आहे*.
दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे.उस्मानाबाद शहर व तालुका आणि कळंब कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
*उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 36 हजार 177 नमुने तपासले त्यापैकी 42 हजार 697 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 32.80 टक्के आहे. जिल्ह्यात 34 हजार 449 रुग्ण बरे झाले असून 81.42 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 1005 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.29 टक्के मृत्यू दर आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 288 रुग्ण , तुळजापूर 72, उमरगा 76, लोहारा 49, कळंब 104, वाशी 48, भूम 137 व परंडा तालुक्यात 28 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा –
दिनांक – रुग्ण – मृत्यू – उस्मानाबाद तालुका
1 मार्च – 09 रुग्ण – 00 मृत्यू
2 मार्च – 40 रुग्ण – 01 मृत्यू
3 मार्च – 16 रुग्ण – 00 मृत्यू
4 मार्च – 45 रुग्ण – 02 मृत्यू
5 मार्च – 26 रुग्ण – 00 मृत्यू
6 मार्च – 30 रुग्ण – 00 मृत्यू
7 मार्च – 49 रुग्ण – 00 मृत्यू
8 मार्च – 16 रुग्ण – 01 मृत्यू
9 मार्च – 38 रुग्ण – 01 मृत्यू
10 मार्च – 24 रुग्ण – 00 मृत्यू
11 मार्च – 58 रुग्ण – 00 मृत्यू
12 मार्च – 27 रुग्ण – 01 मृत्यू
13 मार्च – 54 रुग्ण – 00 मृत्यू
14 मार्च – 69 रुग्ण – 00 मृत्यू
15 मार्च – 52 रुग्ण – 00 मृत्यू
16 मार्च – 123 रुग्ण – 01 मृत्यू
17 मार्च – 94 रुग्ण – 00 मृत्यू
18 मार्च – 164 रुग्ण – 00 मृत्यू
19 मार्च – 119 रुग्ण – 00 मृत्यू
20 मार्च – 125 रुग्ण – 00 मृत्यू
21 मार्च – 118 रुग्ण – 01 मृत्यू
22 मार्च – 173 रुग्ण – 00 मृत्यू
23 मार्च – 130 रुग्ण – 00 मृत्यू
24 मार्च – 176 रुग्ण – 00 मृत्यू
25 मार्च – 174 रुग्ण – 00 मृत्यू
26 मार्च – 155 रुग्ण – 02 मृत्यू
27 मार्च – 224 रुग्ण – 00 मृत्यू
28 मार्च – 184 रुग्ण – 00 मृत्यू
29 मार्च – 239 रुग्ण – 00 मृत्यू
30 मार्च – 242 रुग्ण – 00 मृत्यू
31 मार्च – 253 रुग्ण – 02 मृत्यू
1 एप्रिल – 283 रुग्ण – 04 मृत्यू
2 एप्रिल – 292 रुग्ण – 00 मृत्यू
3 एप्रिल – 343 रुग्ण – 02 मृत्यू
4 एप्रिल – 252 रुग्ण – 00 मृत्यू
5 एप्रिल – 423 रुग्ण – 02 मृत्यू
6 एप्रिल – 415 रुग्ण – 08 मृत्यू
7 एप्रिल – 468 रुग्ण – 05 मृत्यू
8 एप्रिल – 489 रुग्ण – 02 मृत्यू
9 एप्रिल – 564 रुग्ण – 00 मृत्यू
10 एप्रिल – 558 रुग्ण – 07 मृत्यू
11 एप्रिल – 573 रुग्ण – 03 मृत्यू
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
18 एप्रिल – 477 रुग्ण – 16 मृत्यू
19 एप्रिल – 662 रुग्ण – 10 मृत्यू
20 एप्रिल – 645 रुग्ण – 21 मृत्यू
21 एप्रिल – 667 रुग्ण – 23 मृत्यू
22 एप्रिल – 719 रुग्ण – 21 मृत्यू
23 एप्रिल – 719 रुग्ण – 16 मृत्यू
24 एप्रिल – 810 रुग्ण – 20 मृत्यू
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
==================
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू