उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा 4 था बळी गेला असून उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागातील तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. या रुग्णाला कॅन्सरचा आजार होता त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या रुग्णाच्या थेट संपर्कात सर्व जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १४२ झाली असून त्यापैकी ९९ जण बरे झाले आहेत तर ३९ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर ४ जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील ३ व उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू दर २.८१ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ६५.२२ टक्के असल्याची माहिती डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.