जिल्ह्यात 2 हजार 729 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आज कोरोना रुग्णांच्या संख्येने चारशेचा आकडा पार केला. आज नवीन 415 रुग्ण सापडले व 8 जणांचा मृत्यू झाला तर 243 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची रोजची संख्या 400 च्या जवळपास जात असून सक्रिय रुग्णाची संख्या 2 हजार 729 झाली आहे. आज कोरोनाने ज्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला त्यात एका 15 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे.
कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 320 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 95 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 612 झाली आहे.आज कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला आहे त्यात 5 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे. उस्मानाबाद शहरातील बौद्ध नगर येथील 52 वर्षीय महिला,विजय चौक येथील 65 वर्षीय महिला, आनंद नगर येथील 40 वर्षीय पुरुष, आंबेवाडी येथील 77 वर्षीय पुरुष, वाशी तालुक्यातील पारा येथील 70 वर्षीय पुरुष,येडशी येथील 70 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील 50 वर्षीय स्त्री व उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील 15 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 226 रुग्ण सापडले तर तुळजापूर 54, उमरगा तालुक्यात 24 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 2 हजार 729 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 65 हजार 676 नमुने तपासले त्यापैकी 22 हजार 543 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 17.15 टक्के आहे. जिल्ह्यात 19 हजार 190 रुग्ण बरे झाले असून 85.19 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 612 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.72 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 226 रुग्ण , तुळजापूर 54 , उमरगा 24, लोहारा 10, कळंब 50, वाशी 11, भूम 13 व परंडा तालुक्यात 27 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239
30 मार्च – 242
31 मार्च – 253
1 एप्रिल – 283
2 एप्रिल – 292
3 एप्रिल – 343
4 एप्रिल – 423