उस्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान रोड भागातील 8 महिन्याची ही गरोदर महिला शहरात अनेक ठिकाणी गेली आहे . गरोदर महिला ही उस्मानाबाद शहरातील 4 रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्यामुळे या धोका वाढला आहे.
डॉ मिटकरी यांच्याकडे या महिलेची गरोदरपणाची नियमीत तपासणी सुरू होती. महिलेचे वजन जास्त असल्याने व पायाला सूज असल्याने त्यांना लातूर येथे उपचारासाठी पाठविले होते मात्र त्यापूर्वी ही महिला डॉ डंबळ, डॉ स्वामी व सह्याद्री मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी येऊन गेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजभाऊ गलांडे यांनी दिली आहे. ही महिला या 4 रुग्णालयात किती वेळ थांबली होती व तिथे काय उपचार केले यावर या रुग्णालयात कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायच्या यावर निर्णय होणार आहे. ही महिला सध्या लातूर येथे उपचार घेत असून तिथे तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाबाधीत महिला उस्मानाबाद शहरात अनेक ठिकाणी उपचारासाठी गेल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णाची संख्या 139 झाली असून 90 जण बरे झाले आहेत तर 46 जणांवर उपचार सुरू आहेत.