कै पवनराजे हत्याकांडात माफीचा साक्षीदार पारसमल जैनने सांगितला कोर्टात हत्येचा कट
कै पवनराजे हत्याकांड झाल्यापासुन आमचे कुटुंब कायदेशीर संघर्ष करीत आहे. पवनराजे हत्याकांड झाल्यानंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यासह रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करावे लागले त्यानंतर सुद्धा हा संघर्ष संपला नाही. डॉ पाटील व त्यांच्या वकिलांनी विविध क्लुप्त्या कोर्टात वापरून वेळकाढूपणाची भूमिका घेतली त्यामुळे 12 वर्षांपासून ही केस कोर्टात सुरू आहे. या काळात अनेक अनुभव आले मात्र आम्ही खचलो नाही, जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा व संघर्ष कायम सुरू राहील, अण्णा हजारे प्रलंबित प्रकरणात सुद्धा आता लक्ष घालणार असुन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. गृहमंत्री यांनाही याबाबत बोलणार आहे असे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.