कावळेवाडी गावामध्ये मराठा संघर्ष योध्यांचा सन्मान सोहळा
मराठा आरक्षण नाही तर आमदार खासदारांना गावात बंदी व निवडणुकीत मतदान न करण्याचा ऐतिहासिक निर्णय
धाराशिव – समय सारथी
कावळेवाडी गावामध्ये मराठा संघर्ष योध्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. मराठा आरक्षण नाही तर आमदार खासदारांना गावात बंदी व निवडणुकीत मतदान न करण्याचा ऐतिहासिक निर्णय बैठकीत घेण्यात आला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात गावचे सरपंच ऍड अजित अण्णा खोत यांनी तीस दिवसात आरक्षण नाही दिलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी तसेच सर्व निवडणुकीवर बहिष्कार असा ठराव घेतला त्याबद्दल त्यांच गावाकऱ्यांनी कौतुक केले.
जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ ढोकी गावामध्ये जीवन फुलचंद कावळे, ढोकी येथील संग्राम देशमुख, सतीश उर्फ पप्पू वाकुरे पाटील,प्रमोद देशमुख, शिवाजीराव बेडके, मुकेश जाधव,प्रज्वल हुंबे व किशोर शेंडगे उपोषणाला बसले होते त्याचप्रमाणे वाकरवाडीतील मराठा योद्धा उपोषणाला बसलेले होते त्यांचाही सत्कार ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला
समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व योद्धांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कावळेवाडी गावातील तरुण वर्ग जेष्ठ मंडळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी गुणवंत कावळे,धनराज मेकिले,सचिन कावळे,आकाश कावळे,महेश सुरेश कावळे,किरण शिंदे,ओमराज कावळे,चिंतामणी कावळे,वैभव खोत,अजित कावळे,सुमित कावळे,प्रदीप बरकते,अशोक वीर,विनोद कावळे,मेघराज कावळे व निलेश शिंदे सह इतर तरुणांनी सहकार्य केले.