उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिह्यासाठी शनिवार व रविवार हे कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे वार ठरले असून 2 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील 70 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील एका संशयीत रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ सतीश आदटराव यांनी दिली.
कारी येथील रुग्ण 5 ते 6 दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाल्यानंतर गावी गेला होता मात्र त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाला दमा, मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होता मात्र त्यांनी 10 दिवस उपचार घेऊन कोरोनावर मात केली होती व डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांचा मृत्यू झाला. तर कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील रुग्ण हे पुणे येथून आल्यावर त्याला कळंब रुग्णालयात ऍडमिट केले होते मात्र त्याची स्तिथी गंभीर असल्याने त्याला उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या रुगणाला तापीसह लिव्हरचा त्रास होता त्यामुळे या रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहे अशी माहिती डॉ आदटराव यांनी दिली