कळंब मध्ये आज 50 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण – सराफा दुकानातील 42 जणांचा समावेश
कळंब – समय सारथी / अमर चोंदे
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने व्यापारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे . कळंब शहरातील सराफा व्यापारी व दुकाने यांत काम करणारे कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात जवळपास 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत तर तर 10 जण पॉझिटिव्ह आल्याने आज कळंब शहरात 50 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे यातील अनेक जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती.
कळंब शहरातील सर्व व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी कोरोनाची तपासणी पुढील 8 दिवसात करून घेणे बंधनकारक केले आहे. आजपासून यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सराफा व्यापारी यांची तपासणी करण्यात आली.
*वेळापत्रक* –
18 मार्च – सराफ दुकाने
19 मार्च – औषधी दुकाने
20 मार्च – किराणा दुकाने
22 मार्च – बेकरी , हॉटेल्स , लॉजेस, बियर बार
23 मार्च – जनरल स्टोअर्स
24 मार्च – भाजी, फळे विक्रेते
25 मार्च – कटिंग सलून
26 मार्च – कृषी संबंधित दुकाने
27 मार्च – कापड दुकाने.
26 मार्च – गॅरेज, ऑटोमोबाईल दुकाने.
*ठिकाण* – मन्मथ स्वामी मंदिर , सराफ लाईन , कळंब