कर्नाटकवर आहेत छत्रपती शहाजी महाराज व शिवाजी महाराज यांचे उपकार
कर्नाटकचा सातबारा छत्रपती शहाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या नावाचा
थोरल्या संभाजी महाराज यांचे कित्येक शिलालेख सापडले आहेत.कर्नाटकमध्ये प्रांतवाद व भाषावादासारख्या कुजक्या कल्पना मनाशी बांधून कर्नाटक मधील बेळगावी असो की बेंगळूरातील लोक महापुरुषाचा अवमान करत आहेत. ही दुसरी घटना आहे. या कुजक्या व मुर्ख लोकांनी इतिहासाची पाने उघडून पाहावे त्यांना कळेल की शहाजी महाराजांनी कर्नाटक व दक्षिण भारतातील शेकडो राजांना अभय देऊन त्यांची राज्य राखली एवढेच नाही तर त्यांना वेळोवेळी शस्त्रअस्त्र पुरवठा ही केला आहे ( ह्याचीच चाडी अफझलखानाने आदिलशाहाला केली होती म्हणून मोठा बाका प्रसंग शहाजी महाराज यांच्यावर आला होता. ) एवढा मोठा त्रास शहाजी महाराज यांना या कर्नाटकी लोकांना अभय देतात म्हणून झाला.
शहाजी महाराज फर्जंद म्हणून स्वतंत्र कर्नाटकचे राज्य सांभाळत होते.080,000 हजार गावे त्यांच्या ताब्यात होती.तुंगभद्रेच्या काठी हवेशीर अशा अनागोदी या ठिकाणी त्यांनी वाडा व बागा देखील बांधल्या उभारल्या होत्या. शिवाजी महाराज यांचे एक लग्न देखील कर्नाटक ( बंगलोर ) मध्ये झाले आहे. शिवरायांचे मोठे बंधू श्री संभाजी महाराज यांचे कित्येक शिलालेख कर्नाटकमध्ये सापडले असून त्यात दान दिल्याचे उल्लेख मिळतात. ते स्वतंत्र राज्य करत असल्याचा तो पुरावाच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयला जाताना कर्नाटकी लोकांनी मियाँना बंधूच्या छळा विषयी तक्रार केली तेंव्हा महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना सांगून मियानाचा काटा काढला.कित्येक मंदिरांना दान देऊन तर कित्येक मंदिरे परचक्रामुळे बंद होती ती महाराजांनी उघडली व हिंदवी लोकांचे राज्य स्थापले.
बेलवडीच्या देसाईबाईने शिवाजी महाराज यांना भाऊ मानून शिवरायांचे शिल्प करवून घेतले आहेत तर तामिळनाडू येथील मीनाक्षी मंदिरासमोर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा त्याकाळात शिल्पित केला आहे, अशी कैक दक्षिण भारतातील उदाहरणे देता येतील अशी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांना देवा समान मानून कर्नाटकमधील लोकांनी तीनशे वर्षापूर्वी कैक शिल्पे घडवून ती मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी बसवली आहे, तर मग आजच्या ह्या पिढी युगपुरुष असणाऱ्या अशा महाराजांचा का बरं अनादर करत आहेत, प्रांतवाद वेगळा पण यासाठी महापुरुषांना टार्गेट करणं निषेध करण्यासारखं आहे.ज्या कोणी हा अपमान केला आहे त्याला कडक शासन सरकारने करावे. या मराठी वीरांच्या संघर्षामुळे आज दक्षिण भारत आपली संस्कृती जपून आहे यांनी असा अवमान करणे म्हणजे उपकार विसरणे आहे.
© जयराज खोचरे
इतिहास व पुरातत्व अभ्यासक
7020928941