उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा – शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व एसपी शुगर्सचा पुढाकार
प्रथम विजेत्या एकांकिकेस 71 हजार मानाचा करंडक – संमेलनाध्यक्ष सुरेश पाटील यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उस्मानाबाद आणि एस. पी. शुगर्स अँड अॅग्रो प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जानेवारी 2022 मध्ये तिसरी राज्यस्तराचे गंगाधर करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील नाट्य चळवळ वृध्दीगत करण्यासाठी व नाट्य रसिकांना आपले नाट्य विस्तार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच माजी संरक्षण, कृषि मंत्री मा. मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराचा वारसा वृध्दीगंत होण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या वर्षीच्या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून चेअरमन मा. सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे, 2018 मध्ये 53 तर 2019 मध्ये 45 संघ गटातून सहभागी झाले होते. राज्यातील प्रसिध्द नामवंत आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. या स्पर्धेचे देखणे व निटनेटके आयोजन आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि उस्मानाबाद सारखे स्पर्धा स्थळ यामुळे ही स्पर्धा राज्य गटातील नाट्य रसिकांच्या मनात घर करुन आहे.
ही तिसरी स्पर्धा दि. 7, 8 व 9 जानेवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे आयोजित केली आहे. सर्व कलावंताच्या जेवण व राहण्याची व्यवस्था आयोजकांनी मोफत केलेली आहे. तरी राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्था, कलावंत यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन अखिल भारतीय नाट्टय परिषद शाखा उस्मानाबादचे अध्यक्ष मा. विशाल शिंगाडे व एस.पी. शुगर्स अँड अॅग्रो प्रा. लि.चे चेअरमन मा. सुरेश पाटील यांनी केले आहे. अधिकसाठी 8888333895, 9860445153 या क्रमांकावरती संपर्क साधावा.
चौकट
सदर एकांकिका स्पर्धेसाठी पारितोषिके
प्रथम क्रमांक :71,000/- रोख करंडक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक :- 51,000/- रोख करंडक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक :-41,000/- रोख करंडक व प्रमाणपत्र
चतुर्थ क्रमांक :-25,000/- रोख करंडक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ :- 15,000/- रोख करंडक व प्रमाणपत्र
तसेच सर्वोकृष्ठ अभिनेता / अभिनेत्री, लेखक, संगीत, प्रकाश योजना यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे