नगर परिषदेच्या वतीने होणार सत्कार , पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते वितरण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने उस्मानाबाद जिल्याचे नाव लौकिक करणा-या व्यक्तींना उस्मानाबाद भुषण पुरस्कार व उस्मानाबाद शहरातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम सोहळा 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
उस्मानाबाद नगर परिषदेचा स्थापना 25 मे 1958 रोजी झाली असुन प्रत्येक वर्षी 25 मे या दिवशी उस्मानाबाद नगर परिषद स्थापना दिवस म्हणजे वर्धापन दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने हे पुरस्कार जाहीर झाले होते परंतू कोरोना महामारीमुळे पुरस्कार वितरण सोहळा घेता आला नाही त्यामुळे 15 ऑगस्ट 2021 स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन उस्मानाबाद जिल्ह्याचे
15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषदेच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर असतील तर आमदार कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष अभय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
उस्मानाबाद भूषण पुरस्कार 2020 हा पुरस्कार पुरुषोत्तम गायकवाड, माजी न्यायामूर्ती उच्च न्यायालय मुंबई, तथा माजी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य याना देण्यात येणार आहे.पुरुषोत्तम गायकवाड हे उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा या गावचे असुन यांनी वरील पदावर उत्कृष्ठ कार्य करून उस्मानाबाद जिल्हयाचे नाव लौकिक केले आहे.
कार्यगौरव पुरस्कार 2020 क्रिडाक्षेत्रात सारिका काळे कॅप्टन खो.खो राष्ट्रीय टिम, श्री.शिवछत्रपती राज्य क्रिडा पुस्कार 2016 व अर्जुन पुरस्कारप्राप्त-2020, चंद्रजीत जाधव, खो-खो प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रिडा पुस्कार महाराष्ट्र,राम हिरापुरे, क्रिकेट प्रशिक्षक यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे उस्मानाबाद जिल्यातील खेळाडु अंडर-19 राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचु शकले.
कार्यगौरव पुरस्कार 2020 आरोग्यक्षेत्रमध्ये डॉ इस्माईल मुल्ला, कोविड काळातील उत्कृष्ठ रुग्ण सेवेकरिता, डॉ.सचिन देशमुख, डॉ.प्रविण डुमणे, डॉ.विशाल वडगांवकर, डॉ सुश्रुत डंबळ, डॉ शकील अहमद खान,डॉ अनुराधा लोखंडे यांना देण्यात येणार आहे.
कार्यगौरव पुरस्कार 2020 सामाजिक क्षेत्रमध्ये संजय प्रकाश निंबाळकर उस्मानाबाद शहरात स्वखर्चाने वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन, शैक्षणिक क्षेत्रमध्ये सुधीर केशव पाटील पद्रमभूषण डॉ मनोहर पर्रीकर नॅशनल मेमोरियल अवार्ड-2020 व डॉ शामाप्रसाद मुर्खजी एक्सलंट अवार्ड,लहू लोमटे व सुरेश गायकवाड यांना नगर परिषद शिक्षक कोरोना काळातील कार्याकरिता देण्यात येणार आहे.कार्य गौरव पुरस्कार 2020 कला क्षेत्र दिपाली नायंगावकर झी युवा वाहिनीवर युवा डान्सींग क्वीन स्पर्धक तर कार्यगौरव पुरस्कार 2020 नगर परिषद उस्मानाबाद पुरस्कार पृथ्वीराज पवार उपमुख्याधिकारी , संजय कुलकर्णी कार्यालय अधिक्षक,सुनिल कांबळे स्वच्छता निरिक्षक यांना कोरोना काळातील कार्याकरिता पुरस्कार तर विलास गोरे स्वच्छता निरिक्षक सहायक कोरोना बाधीत मृतांवर अंतविधी करिता दिला जाणार आहे.
कार्यगौरव पुरस्कार 2020 सिव्हील हॉस्पिटल (कर्मचारी) जावदकर सुमन बासु,सौ वहिदा शेख,सौ।उषा दाणे, सौ संध्या निकम,सौ.सुरेखा जाधव, निलेश पाचभाई या सर्वांना कोरोना काळात उत्कृष्ठ रुग्ण सेवेकरिता पुरस्कार दिला जाणार आहे तर कार्यगौरव पुरस्कार 2020 साहित्य क्षेत्रमध्ये युवराज नळे साहित्यक गजल,कविता,अंभग यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा मधील विविध रचना करिता दिला जाणार आहे तरी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी केले आहे.