उस्मानाबाद नगर परिषदेचा 63 वा स्थापना दिवस – पी बी गायकवाड यांना उस्मानाबाद भुषण पुरस्कार जाहीर
उस्मानाबाद कार्यगौरव पुरस्कारही जाहीर,लवकरच वाटप – नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेचा 63 वा स्थापना दिवस पूजन करून साजरा करण्यात आला यानिमित्ताने पी बी गायकवाड यांना उस्मानाबाद भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तर उस्मानाबाद कार्यगौरव पुरस्कारही जाहीर करण्यात आला असून लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची दिली.
उस्मानाबाद नगर परिषदेची स्थापना 25 मे 1958 रोजी झाली होती. 25 मे 2021 रोजी उस्मानाबाद नगर परिषदेचा 63 वा स्थापना दिवस जेष्ठ नगरसेवक शिवाजी पंगुडवाले यांच्या हस्ते वास्तु पुजन करून साजरा करण्यात आला.
तसेच नगर परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद भुषण पुरस्कार व उस्मानाबाद कार्यगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली .
नगर परिषदेने कला,क्रिडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उस्मानाबाद जिल्ह्याचे नावलौकिक करण्याऱ्या व्यक्तींना उस्मानाबाद भुषण पुरस्कार देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. त्या समितीने सन्माननीय पुरूषोत्तम बापुराव गायकवाड (माजी न्यायमुर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा माजी लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य.) यांची शिफारस केली आहे. तसेच कला, क्रिडा, साहित्य तसेच सामाजिक क्षेत्रात व कोव्हिड 19 या जागतिक महामारीच्या काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि मोहल्ला क्लिनिक मध्ये काम करणारे डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांना देखील उस्मानाबाद कार्यगौरव पुरस्कार देण्याचा देखील ठराव पारित करण्यात आला व सर्व गौरविण्यात येणा-या व्यक्तींची निवड ही करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील व शहरातील वरील घोषित करण्यात आलेले पुरस्कार कोव्हिड 19 प्रसार टाळण्यासाठी सर्व सत्कारमुर्तींना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते घरपोच करण्यात येणार आहेत.
यावेळी माझ्या समवेत नगरसेवक युवराज नळे, प्रदिप घोणे, बाबा मुजावर, दाजीआप्पा पवार, माजी नगरसेवक रोहीत निंबाळकर, तुषार निंबाळकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय कुलकर्णी, आदींसह इतर मान्यवर व सर्व अधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते.