जिल्ह्यात कोरोनाचे रविवारी ६ नवीन रुग्ण सापडल्याने खळबळ उघडली आहे. उस्मानाबाद शहरासह धुता गावातील १ ,परंडा तालुक्यातील 1, उमरगा तालुक्यातील 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. रविवारी एकूण ४७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ६ पॉझिटिव्ह आले असून 36 अहवाल निगेटीव्ह आहेत तर ६ जणांचे अहवाल inconclusive आले आहेत. कोरोना रुग्णाची संख्या ३५ झाली असून त्यापैकी ६ जण बरे झाले असून २९ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आजवर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील ८ , लोहारा ५ व परांडा या तालुक्यात ६ रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात ७ रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका २ वाशी तालुका ३ व उस्मानाबाद ३ व तुळजापूर येथे १ कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. यातील ६ जण बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १ हजार ११४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्यातील ९९८ अहवाल निगेटीव्ह आले असून ७६ अहवाल प्रलंबित आहेत.
उमरगा तालुक्यातील केसरजवळगा या गावातील एक महिला कोरोना बाधित आढळली असून या महिलेचा सोलापूर येथील रुग्णाशी संपर्क आला होता तर उमरगा शहरात दोन पुरुष रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यातील एक रुग्ण हा एसटी कॉलनी येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात होता तर दुसरा रुग्ण सोलापूर येथील एका रुग्णाच्या संपर्कात आला होता . परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील एका महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला असून ही महिला तिच्या पतीसह दहिसर मुंबई येथून आली होती या महिलेच्या पतीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील धुता येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव आला असून ती महिला मुंबई येथून आली आहे तर उस्मानाबाद शहरातील देशपांडे स्टॅण्डजवळील जोशी गल्ली येथील एका पुरुष रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हा रुग्ण गेल्या काही दिवसापूर्वी सोलापूर येथे हे वैद्यकीय उपचारासाठी गेला होता.