उस्मानाबाद जिल्ह्यात 5 दिवसांचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने व राजकीय पक्षांसह विविध संघटनेच्या कडक लॉकडाउनच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 8 मे ते 13 मे या काळात 5 दिवसांचा जनता कर्फ्युचे लेखी आदेश जाहीर केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.
8 मे सकाळी 7 ते 13 मे सकाळी 7 या 5 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू राहतील असे आदेशीत केले आहे अत्यावश्यक सेवेत दवाखाने, लसीकरण, औषधी दुकाने, टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, पेट्रोल पपं,एटीएम,विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा सुरू राहतील, या जनता कर्फ्यु काळात भाजीपाला , फळ विक्री , किराणा दुकान , बेकरी व इतर आस्थापना दुकाने बंद राहतील. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची ब्रेक द चेन या मोहिमेस फायदा होणार असून रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दररोज 700 ते 800 रुग्ण सापडत असून 10 ते 15 जणांचा मृत्यू होते आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, फुंक संघटनेचे अध्यक्ष एम डी देशमुख सचिव धर्मवीर कदम यांच्यासह अनेक संघटना व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली होती त्याची दखल घेत 5 दिवसांचा जनता कर्फ्यु आदेश जारी केले आहेत.
एक दिवस आधी ही सूचना द्यायला हवी होती नागरिकांनी घरात किराणा सामान तरी भरून ठेवले असते corona ne मारण्या ऐवजी गरीब माणूस उपाशी राहून मरेल