उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 61 झाली असून यातील बहुतांश कोरोना रुग्ण हे मुंबई पुणे, सोलापूरहुन आले असल्याने उस्मानाबाद जिल्हयाला बाहेरून येणाऱ्या नागरिकांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात बाहेरील किंवा इतर राज्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली असून १० एप्रिल ते २७ मे या काळात २७ हजार ७८ नागरिक उस्मानाबाद जिल्ह्यात आले आहेत. २७ हजार ही शासकीय आकडेवारी असली तरी लॉकडाउन काळात जवळपास १ लाख नागरिक उस्मानाबाद जिल्ह्यात आले आहेत.
प्रशासनांकडे नोंद असलेल्या २७ हजार ७८ नागरिकांपैकी ८ हजार ६२९ जणांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन काळ संपला आहे तर १८ हजार ४४९ जण निगराणीखाली आहेत. उस्मानाबाद तालुक्यात ४४३२, तुळजापूर ५३६४, लोहारा ३१८१, उमरगा ३७८९, कळंब ४०८२, वाशी १५६४, भूम २१६० व परंडा तालुक्यात २५०६ असे २७ हजार ०७८ नागरिक झाले आहेत. यातील ७ हजार ९२१ जणांना घरी, ११ हजार ६२३ नागरिकांना शेतात, ६ हजार ९७३ जणांना शाळेत तर १२३ जणांना इन्स्टिट्युटमध्ये व ४३८ जणांना इतर ठिकाणी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1317 नागरिकांचे कोरोना स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 1093 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आजवर 61 रुग्ण सापडले असून त्यातील १२ रुग्ण हे कोरोनामुक्त असून 49 रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, यातील बहुतांश कोरोना रुग्ण हे मुंबई, पुणे व सोलापूर येथून आले होते. त्यामुळे यापुढे सर्वाधिक धोका हा बाहेरून येणार्या नागरिकापासून आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी संसर्ग होऊ नये यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी घरात राहून वैद्यकीय सल्ला पाळणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्ण सापडलेले २५ भाग कंटेनमेंट झोन जाहीर केले असून त्या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बद असून जिल्हा प्रशासन मुंबई पुणेसह बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती घेत आहे.