उस्मानाबाद शहरातील ७ तर उमरगा येथील २ रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरासाठी आजचा दिवस हा धक्कादायक ठरला असून शहरातील ७ तर उमरगा येथील २ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर या भागातील सापडलेल्या रुग्णाचे नातेवाईक व इतरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उमरगा येथील २ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या ६२ झाली असून यातील बहुतांश कोरोना रुग्ण हे मुंबई पुणे, सोलापूरहुन आले असल्याने उस्मानाबाद जिल्हयाला बाहेरून येणाऱ्या नागरिकांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1317 नागरिकांचे कोरोना स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 1093 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आजवर ६२ रुग्ण सापडले असून त्यातील १२ रुग्ण हे कोरोनामुक्त असून ५० रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, यातील बहुतांश कोरोना रुग्ण हे मुंबई, पुणे व सोलापूर येथून आले होते. त्यामुळे यापुढे सर्वाधिक धोका हा बाहेरून येणार्या नागरिकापासून आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी संसर्ग होऊ नये यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी घरात राहून वैद्यकीय सल्ला पाळणे गरजेचे आहे